प्रस्तावना

“शब्द संपत नाहीत; ते पिढ्यान्‌पिढ्या संस्कार बनून जगत राहतात.”

खरंतर सर्वसामान्य माणूस वृत्तीत ओळखणाऱ्या भौतिक अभिनिवेशापासून दूर असणाऱ्या माई म्हणजे सर्वांसाठी निलेप प्रेमाचा झरा. तरीही सांसारिक जीवनात त्यांनी पत्नीत्व (वाग्जीवनी) परमेश्वर मानले आणि पतीच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा-सुश्रुषा केली.

आपला-गेल्यांचं स्थान कारण, त्यांना खाऊ-पिऊ घालणं या गोष्टी त्या आनंदानं करीत. आपलेपणाच्या कोमलतेनं जाण, न जमल्यास आवर्जून आहेर पाठवणे. या गोष्टी त्या आपुलकीने करीत. त्यांचा व्यवहार अत्यंत योग्य होता. माईंना उत्तम शिवणकाम, भरतकाम तसेच काशिदाकारी येत होती.

धुळ्याला राहायला असताना दारामार रस्त्यावर राहणाऱ्या टोपल्या विणणाऱ्या विणणाऱ्या वूरुड त्या मोफत कपडे शिवून देत असत. पाककलेतही त्या निपुण होत्या. त्यांना हातावरचे मांडे अगदी उत्तम करता येत होते. माई अत्यंत शोषिक. आपल्याला होणाऱ्या त्रासाचा किंवा आजारपणाचा कधीही त्यांनी बाऊ केला नाही.

शेवटपर्यंत त्या कोणावरही अवलंबून न राहता सर्व बाबतीत आत्मनिर्भर होत्या. त्यांची कविता हीच त्यांची खरी संपत्ती होती. त्या प्रकाशित कराव्या म्हणून त्यांनी मृत्युपत्र करून ठेवले होते. तेव्हढ्या पैशात कविता प्रकाशित होणार नसतील तर काही रक्कमेची तरतूद करून ठेवली होती.

त्यामुळे कविता प्रकाशित होणार नसतील तर काव्य-साहित्य गंगार्पण करावे व ते पैसे बापुंजीच्या नावे निफाड येथील समाजाच्या शिक्षण फंडाला मुलांना स्कॉलरशिपसाठी देणगी म्हणून द्यावेत, अशी स्पष्ट सूचनाही त्यांनी देऊन ठेवलेली आहे. यातून त्यांचे द्रष्टेपण आणि अलिप्त वृत्ती दिसून येते.

माईंनी वयाच्या ७५व्या वर्षी सन २००३ मध्ये आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात, बालपणी राहत असलेल्या वडिलांच्या यवतमाळच्या घराचा प्रमाणबद्ध नकाशा, वास्तुविशारद लाजेल इतक्या बारकाईने तपशील देत पुढील पिढ्यांना उपयुक्त असा काढून ठेवलेला आहे, यातून त्यांची स्मरणशक्ती लक्षात येते. मूर्ती लहान पण कीर्ती महान, व्यावहारिक व आध्यात्मिक जीवनाचा कुठेही समतोल ढळू न देता अत्यंत साधे आणि परिपूर्ण जीवन व्यतीत केलेल्या माईनी आपल्या सर्वांना जीवन जगण्याची कला दाखवून दिली आहे. त्यांच्यावरील लिहावं तितकं थोडंच आहे. माईना विनम्र वंदन करून इथेच थांबतो. — तुषार पांगारकर वर्धापुरी, बुधवार, दि. २७.६.१८

व्यक्ती काळाच्या पडद्याआड जाते; परंतु तिचे विचार, संस्कार आणि साहित्य अमर राहते. बय पिसी यांचे भक्तिमय साहित्य हेच त्यांचे चिरंतन स्मारक असून, BayPisi.com त्या साहित्यवारशाचे जतन व संवर्धन करण्याचा एक विनम्र प्रयत्न आहे.