बय पिसी- स्मृती रुपेण

प्रस्तावना

माईंनी वयाच्या ७५व्या वर्षी सन २००३ मध्ये आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात, बालपणी राहत असलेल्या वडिलांच्या यवतमाळच्या घराचा प्रमाणबद्ध नकाशा, वास्तुविशारद लाजेल इतक्या बारकाईने तपशील देत पुढील पिढ्यांना उपयुक्त असा काढून ठेवलेला आहे, यातून त्यांची स्मरणशक्ती लक्षात येते.मूर्ती लहान पण कीर्ती महान, व्यावहारिक व आध्यात्मिक जीवनाचा कुठेही समतोल ढळू न देता अत्यंत साधं आणि परिपूर्ण जीवन व्यतीत केलेल्या माईंनी आपल्या सर्वांना जीवन जगण्याची कला दाखवून दिली आहे.

❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈

श्रीमती कै अन्नपूर्णा लक्ष्मण कांबळे

  • भाव संवादातील संवाद
    जमेल तेव्हा, जमे तसे | जमेल तितूके, तत्व कसे || जीव प्रपंची असा फसे | प्राप्त बदले न फारसे || बाह्या, मध्यंतर पिसे | ज्ञाना ज्ञानी, समच वसे || चर्मचक्षूने स्थूल दिसे | ज्ञानचक्षूने सूक्ष्म ठसे || – बय पिसी भावार्थ: मनुष्य प्रपंचात इतका गुंतून जातो की, बाह्य परिस्थिती बदलली तरी त्याच्या अंतर्मनात फारसा बदल… Read more: भाव संवादातील संवाद

❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈

मान्यवरांचे मनोगत

परंतु शबरीने अर्पण केलेली बोरे उष्टी आहेत याकडे लक्ष न देता, शबरीचा उत्कट भक्तिभाव तेवढा रामचंद्रांनी ग्रहण केला, तसेच रसिकही श्रीमती कांबळे यांच्या गीतातील आर्ततेने सहकंपित होऊन उठतील, असा विश्वास वाटतो.

वसंत निनावे (गीतकार )


सौ. कांबळे यांची गीते ही गीते नसून तो ‘अंतरीचा उद्गार’ आहे, हे ती गीते वाचल्याक्षणीच जाणवते.

भानुकान्त लुकतुके (संगीतकार)