कवीश्वरा पदार्पण

लक्ष्मीपद । पावता घरा ।

पावित्र्य येतच । परिसरा ॥ १ ॥

मंगल गीते । स्फुरत हरा |

अलगद । शिवतच उच्चस्वरा ॥ २ ॥

हर्ष बालका । स्त्रीया-नरा ।

निवदे निवतच – परंपरा ॥ ३ ॥

तीर्थ-प्रसाद चाखता जरा ।

मिठ्या मारतच परस्परा ॥ ४ ॥

उधाण अनटळ । घरा पुरा ।

बय-पिसी । टिपूण्या करी त्वरा ॥ ५ ॥

पद-लाखौली । कवीश्वरा ।

पुजतच भावे । श्री-श्रीधरा ॥ ६ ॥


Comments

Leave a Reply